श्रीमंत रामराजे मोटार वाहतूक संस्थेची आज वार्षिक सर्वसाधारण सभा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. 29 सप्टेंबर 2024 । फलटण । येथील श्रीमंत रामराजे मोटार वाहतूक संस्थेची 24 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज रविवार दि. 29 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी संस्थेचे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली गोविंद मिल्क अ‍ॅण्ड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि., च्या सभागृहामध्ये आयोजित केलेली आहे. तरी संस्थेच्या सर्व सभासदांनी व हितचिेंतकांनी उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेच्यावतीने व्यवस्थापक विश्वास परकाळे यांनी केले आहे.

सदर वार्षीक सर्वसाधारण सभेमध्ये संचालक मंडळाच्या आदेशावरुन मागील झालेल्या सभेचा वृत्तांत वाचून कायम करणे, व्यवस्थापक मंडळाने सादर केलेला अहवाल वाचन करणे, नफातोटा व ताळेबंद पत्रकाचे वाचन करणे, नफा वाटणीपत्रकाचे वाचन करुन मंजूरी देणे, अंदाजपत्रकाचे वाचन करणे, लेखापरिक्षणाची दोषदुरुस्तीसह नोंद घेणे. स्थानिक हिशोब तपासणीस नेमणे यासह अध्यक्षांच्या मान्यतेने येणार्‍या विषयांचा विचार करणे अशानुसार वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न होणार आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!