दुष्काळी परिस्थितीमुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; शासनाचा महत्त्वाचा निर्णय

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

राज्यातील ३०४ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती असल्याने शासनाने सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढील आदेशापर्यंत पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

स्थैर्य, सातारा, दि. ०२ नोव्हेंबर : राज्यातील ३०४ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे राज्य शासनाने सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढील आदेशापर्यंत पुढे ढकलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नुकतीच सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची मतदान प्रक्रिया पार पडली असून, आता विकास सोसायट्यांच्या निवडणुका लांबणीवर पडल्याने राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

दुष्काळ निवारणाच्या कामांना प्राधान्य

राज्यात खरीप हंगाम २०२६ मधील परिस्थितीनुसार ३०४ तालुके दुष्काळी म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. या ठिकाणी मदत व पुनर्वसन तसेच महसूल, कृषी, सहकार आणि पाणीपुरवठा विभागांवर दुष्काळ निवारणाची अतिरिक्त प्रशासकीय जबाबदारी आली आहे. अशा परिस्थितीत निवडणूक प्रक्रिया राबवल्यास प्रशासकीय यंत्रणेवर ताण येऊ शकतो, तसेच शेतकरी आणि सभासदांना निवडणुकीत सहभागी होणे गैरसोयीचे ठरू शकते. याचा विचार करून शासनाने हा निर्णय घेतला आहे.

विकास सोसायट्यांच्या निवडणुकांवर परिणाम

सातारा जिल्ह्यात नुकतीच जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी मतदान प्रक्रिया संपन्न झाली. या निवडणुकीत विकास सोसायटीच्या मतदारांना अतिशय महत्त्व आले आहे. त्यामुळे आगामी काळात दोन्ही प्रमुख राजकीय गट या विकास सोसायट्यांच्या निवडणुका ताकदीने लढवणार यात शंका नाही. मात्र, शासनाच्या नव्या आदेशानुसार गृहनिर्माण संस्था, न्यायालयाचे आदेश असलेल्या संस्था आणि ज्या ठिकाणी नामनिर्देशनाची प्रक्रिया सुरू झाली आहे, त्या वगळून इतर सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढील आदेशापर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे राजकीय कार्यकर्त्यांना आता प्रतीक्षा करावी लागणार आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!