
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य | दि. २० नोव्हेंबर २०२४ | फलटण | विधानपरिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण शहरातील मुधोजी क्लब येथे असणाऱ्या मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. श्रीमंत रामराजे यांनी मतदान केंद्रावर जात मतदानाच्या रांगेमध्ये थांबून आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

यावेळी श्रीमंत रामराजे यांच्यासोबत विविध पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी माजी नगरसेविका श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, युवा नेते श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.


