
दैनिक स्थैर्य । दि.15 नोव्हेंबर 2021 । फलटण । महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून लवकरच सेवेसाठी दाखल होणार असल्याची माहिती स्वत: ना.श्रीमंत रामराजे यांनी व्हॉटसअॅप स्टेटसद्वारे दिली आहे.
आपल्या सर्वांच्या आशीर्वादांमुळे मी दवाखान्यातून घरी आलो आहे. लवकरच आपल्या सेवेला हजर होणार, असा व्हॉटसअॅप स्टेटस ना.श्रीमंत रामराजे यांनी अपलोड केला आहे.