श्रीमंत रामराजे व श्रीकांत देशपांडे यांनी घेतला फलटण तालुका संस्कृती महोत्सवाचा आढावा


दैनिक स्थैर्य | दि. 15 जानेवारी 2022 | फलटण | येथील उद्या दि. 16 व 17 जानेवारी रोजी फलटण तालुका संस्कृती महोत्सवाचे आयोजन हे थिंक महाराष्ट्र डॉट कॉम व महाराष्ट्र राज्य साहित्य परिषद शाखा फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने फलटण तालुका संस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाबाबतचा आढावा विधानपरिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सविस्तर आढावा घेतला.

यावेळी विधानपरिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, महाराष्ट्र राज्य संस्कृती मंडळाचे सदस्य रवींद्र बेडकिहाळ, जेष्ठ पत्रकार अरविंद मेहता, थिंक महाराष्ट्र डॉट कॉमचे दिनकर गांगल, प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप, तहसीलदार समीर यादव, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक तुषार नाईक निंबाळकर, सद्गुरू पतसंस्थेचे चेअरमन तेजसिंह भोसले, पत्रकार प्रा. सतीश जंगम, महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण शाखेचे कार्याध्यक्ष महादेवराव गुंजवटे, प्रमुख कार्यवाह अमर शेंडे, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे विश्‍वस्त भारद्वाज बेडकिहाळ, राज्य निवडणूक कार्यालच्या प्रमुख अधिकारी पल्लवी जाधव, थिंक डॉट कॉमचे पूर्णवेळ कार्यकर्ते नीतेश शिंदे उपस्थित होते.

मकर संक्रांतीदिवशीच या प्रमुख मान्यवरांचे फलटण शहरात आगमन झाल्याचे औचित्य साधत महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण शाखेतर्फे विधानपरिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सर्वांना तिळगूळ वाटप करीत मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.


Back to top button
Don`t copy text!