दैनिक स्थैर्य | दि. २६ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
ग्रामपंचायत कोळकी (ता. फलटण) येथील विविध विकासकामांचे लोकार्पण व शुभारंभ विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते शुक्रवार, दि. २७ ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी ५.०० वाजता होणार आहे. हा कार्यक्रम ग्रामपंचायत कार्यालय, कोळकी येथे संपन्न होणार आहे. दरम्यान, या कार्यक्रमानंतर सायंकाळी ६.३० वाजता कोळकी ग्रामपंचायत कार्यालयासमोर जाहीर सभा होणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपकराव चव्हाण असणार आहेत. यावेळी फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. तसेच फलटण पं.स.चे गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता के.बी. भोईटे, जि.प. बांधकामचे उपअभियंता आर.बी. मठपती, कोळकीचे माजी सरपंच दत्तात्रय शिंदे, जि.प. सदस्या सौ. भावनाताई माणिकराव सोनवलकर, पंचायत समिती सदस्य सचिन रणवरे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कोळकीच्या सरपंच सौ. स्वप्ना कोरडे, उपसरपंच विकास नाळे, ग्रामविकास अधिकारी आर. सी. साळुंखे, ग्रा.पं. सदस्य व समस्त ग्रामस्थांनी केले आहे.
लोकार्पण होणारी कामे (२५३ लक्ष)
- वनदेवशेरी टाकी (जलजीवन मिशन योजनेंतर्गत)
- महादेवनगर टाकी (जलजीवन मिशन योजनेंतर्गत)
- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृह
- श्री संत सेना महाराज सभागृह
- साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे सभागृह
- त्रिमूर्ती अपार्टमेंट ते बोथेकर घर रस्ता
- नरसोबा नगर अंतर्गत रस्ता
- सावतामाळी नगर जमदाडे घर रस्ता
- बुवासाहेब नगर अंतर्गत रस्ता
- मालोजीनगर रूपनवर ते सैनिक संघटना रस्ता
- मालोजीनगर सरतापे ते क्षीरसागर घर रस्ता
- वनदेवशेरी महादेव मंदिर ते नाळे घर रस्ता
- गोविंद डेअरी ते नेवसे वस्ती रस्ता
- झणझणे घर ते फलटण-शिंगणापूर रोड गटर
- मालोजीनगर सटवाई मंदिर रस्ता
- शारदानगर अवघडे घर, कांबळे घर रस्ता
- महादेवनगर अंतर्गत रस्ते खडीकरण
- हॉटेल मुळीक ते ओढा गटर
- पखालेमळा गटर
- व्होरा गॅरेज ते ओढा गटर
(१५ वा वित्त आयोग ग्रा.पं. स्तर – १४.५० लक्ष)
- वनदेवशेरी सुरेश जाधव घर ते ओढा गटर
- नरसोबानगर घोलप घर गटर
- बुवासाहेब नगर अंगणवाडी कंपाऊंड
- नरसोबानगर अंगणवाडी ब्लॉक बसविणे
- अक्षतनगर अंतर्गत गटर करणे
भूमिपूजन होणारी कामे
(२५/१५ योजनेंतर्गत – १०३ लक्ष)
- किरण बोळे ते काकडे घर रस्ता करणे
- नक्षत्र अपार्टमेंट रस्ता करणे
- जलशुध्दीकरण केंद्र रस्ता करणे
- मालोजीनगर अंतर्गत बंदीस्त गटर
- राऊत घर ते महादेव कदम रस्ता करणे
- नरसोबानगर अंतर्गत रस्ता करणे
- वनदेवशेरी अंतर्गत रस्ता करणे
- महादेवनगर ते कृष्णा अपार्टमेंट रस्ता करणे
- रावरामोशी पूल ते खडकहिरा गटर करणे
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर योजना – २० लक्ष)
- मालोजीनगर काकडे घर गटर करणे
- मालोजीनगर झणझणे घर रस्ता करणे
- वनदेवशेरी अंतर्गत रस्ता करणे
(आमदार फंड – २० लक्ष)
- बँक ऑफ महाराष्ट्र रस्ता करणे
- पद्मावती नगर रस्ता करणे
- सावतामाळी नगर कमान ते गगनगिरी रस्ता करणे
(१५ वा वित्त आयोग ग्रा.पं. स्तर – १७ लक्ष)
- पखाले मळा गटर करणे
- उपकेंद्र कंपाऊंड करणे
- सावतामाळी नगर गटर करणे
- महादेवनगर नाळे मळा पूल बांधणे
- कोळकी अंतर्गत पाणीपुरवठा पाईपलाईन करणे