दैनिक स्थैर्य | दि. २६ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
कृषी महाविद्यालय फलटण येथील अंतिम वर्षातील विद्यार्थिनींनी ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२३-२४ या कार्यक्रमांतर्गत पिंपरद येथे शेतकर्यांना कीटक मित्रांविषयीची माहिती दिली. यावेळी दहा शेतकरी उपस्थित होते.
या गट चर्चेत लक्ष्मण भगत, प्रताप शिंदे, युवराज जाधव, कैलास भगत व इतर शेतकरी उपस्थित होते. यावेळी कृषीकन्यांनी कीटक मित्र क्रायसोपरला, ड्रॅगन फ्लाय तसेच पिठ्या ढेकूण, हुमणी, पांढरी माशी, नागअळी या कीटकांचे जीवनचक्र चार्टद्वारे दाखवून त्यांची माहिती शेतकर्यांना दिली.
कृषी महाविद्यालय फलटणचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण सर कार्यक्रम अधिकारी प्रा. निलिमा धालपे मॅडम तसेच कार्यक्रम समन्वयक स्वप्निल लाळगे सर आणि प्रा. नितिशा पंडित मॅडम व प्रा. यादव सर यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली कृषीकन्या कु. प्रतीक्षा जगताप, समृद्धी जगताप, आरती जाधव, प्रणिता गोडसे, अक्षदा जाधव, आर्या जाधव, निशिगंधा खुडे यांनी हे प्रात्यक्षिक यशस्वीरित्या पार पाडले.