दैनिक स्थैर्य | दि. ६ जुलै २०२४ | फलटण |
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत निर्मलादेवी प्राथमिक विद्यामंदिर फलटण या शाळेतील गोवेकर राजवीर नितीन (३०० पैकी २३८ गुण) आणि ठोंबरे सार्थक संदीप (३०० पैकी २३४ गुण) या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत घेण्यात येणार्या इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा (२०२३-२४) मध्ये गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले.
या यशाबद्दल विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, संस्थेचे सेक्रेटरी व जिल्हा परिषद साताराचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, नगरसेविका श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, शाळेच्या चेअरमन श्रीमंत शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, व्हा. चेअरमन सौ. वसुंधरा नाईक निंबाळकर, शाळा समितीचे सर्व सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. लोंढे, संस्थेचे प्रशासन अधिकारी निकम, तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. वैशाली जाधव, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक, पालक यांचे अभिनंदन केले.