श्रीमंत बंटीराजे खर्डेकर – निंबाळकर यांचे निधन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. 12 ऑक्टोबर 2024 | फलटण | तालुक्याचे ज्येष्ठ उद्योजक श्रीमंत बंटीराजे खर्डेकर – निंबाळकर यांचे पुणे येथे निधन झाले असून उद्या सकाळी 8 वाजता फलटण येथील “भवानी हाऊस” येथे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी 10 वाजता फरांदवाडी येथील “श्री साईराजा फूड पार्क” येथे अंत्यसंस्कार संपन्न होणार आहेत.

ज्येष्ठ उद्योजक श्रीमंत बंटीराजे खर्डेकर – निंबाळकर हे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष स्व. श्रीमंत दादाराजे खर्डेकर – निंबाळकर यांचे बंधू तर आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे सासरे होत.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!