दैनिक स्थैर्य | दि. १७ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
श्री सद्गुरू हरिबाबांचा १८३ वा प्रगट दिन व रथोत्सव सोहळा मंगळवार, २४ ऑक्टोबर २०२३ ते २६ ऑक्टोबरदरम्यान संपन्न होत आहे.
मंगळवार, दि. २४ ऑक्टोबर विजयादशमी दसर्याला सायंकाळी ६.०० वाजता विधान परिषदेचे माजी सभापती, श्री सद्गुरू हरिबुवा साधु महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते रथपूजन होणार असून सायंकाळी ७ ते १० वाजता ‘ॐ दत्त चिले ॐ’ भजनी मंडळाची भजन सेवा होईल.
बुधवार, दि. २५ ऑक्टोबर रोजी सकाळी ६.०० वाजता महाभिषेक, सकाळी ८ ते ११ री हरिचरित्र वाचन (व्यासपीठ – श्री. चंदूकाका वादे), दुपारी १२ ते २ पंचक्रोशीतील सांप्रदायिक भजनी मंडळाची भजनसेवा, दुपारी २ ते ५ भजन स्पर्धा (कै. विशाल भुजंगराव भोईटे यांच्या स्मरणार्थ), सायंकाळी ५ ते ६ प्रवचन, सायंकाळी ८ ते ११ शिवाजी हुपरे प्रस्तुत श्री संतकृपा संगीत सोंगी भजनी मंडळ, मंगळवार पेठ, कोल्हापूर यांचा कार्यक्रम होईल.
गुरुवार, दि. २६ ऑक्टोबर रोजी श्री सद्गुरू हरिबाबा महाराज यांचा प्रगट दिन सोहळा. सकाळी ६ वाजता महाभिषेक, सकाळी १०.१० वाजता ‘श्रीं’च्या रथाचे पूजन व प्रस्थान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते होईल. सायंकाळी ७ वाजता आरती व महाप्रसाद वाटप होईल.
त्यानंतर सर्व विश्वस्तांच्या व भाविकांच्या उपस्थितीत नगर प्रदक्षिणेस सुरूवात होईल. ही नगर प्रदक्षिणा ‘श्रीं’च्या मंदिरापासून सुरू होऊन मलठणमार्गे फलटण शहरातून उघडा मारूती मंदिर, शिवाजी महाराज पुतळा, नगर परिषद, उपळेकर काका मंदिर, मेटकरी गल्ली, शिंपी गल्ली, श्रीराम मंदिर, गजानन चौक, मारवाड पेठ, शुक्रवार पेठ, शंकर मार्केट, बुरूड गल्ली ते ‘श्रीं’चे मंदिर अशी नियोजित आहे.
या सर्व कार्यक्रमास भाविक भतांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री सद्गुरू हरिबुवा साधू महाराज देवस्थान ट्रस्ट, श्री सद्गुरू हरिबाबा रथोत्सव समिती व ॐ दत्त चिले ॐ भजनी मंडळाकडून करण्यात आले आहे.