
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. १ एप्रिल २०२४ | फलटण |
महाराष्ट शासनाचा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार’ श्रीराम एज्युकेशन सोसायटीस प्राप्त झाल्याबद्दल सोसायटीचे मानद सचिव डॉ. सचिन बेडके (सूर्यवंशी) यांचा संगिनी फोरम, फलटण यांच्यातर्फे शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी व्यापारी महासंघाचे चेअरमन व श्रीराम सोसायटीचे संचालक श्री. मंगेशभाई दोशी, रविकांत इंगवले, संगिनी फोरम अध्यक्षा सौ. अपर्णा जैन, सचिव प्रज्ञा दोशी, खजिनदार सौ. मनिषा घडिया, माजी अध्यक्षा सौ. नीना कोठारी, जैन सोशल ग्रुप उपाध्यक्ष श्री. श्रीपाल जैन व संगिनी सदस्या सौ. नेहा दोशी, सौ. सारिका दोशी, सौ. संध्या महाजन, सौ. निलम डूडू उपस्थित होत्या.
