दैनिक स्थैर्य | दि. ६ सप्टेंबर २०२३ | फलटण |
फलटण शहरातील शुक्रवार पेठेतील चावडी चौकात स्थित असलेल्या जागृत देवस्थान श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिराचा शिखर व कलशारोहण समारंभ उद्या, गुरुवार, दि. ७ सप्टेंबर रोजी परमपूज्य महंत प्रभागिरी महाराज निमोही (आखाडा) शिरढोण (कोरेगाव) यांच्या हस्ते होणार आहे.
गुरुवारी सकाळी ८.३० ते १०.३० वाजेपर्यंत श्री गणेश पूजन, पुण्यवाचन. सकाळी १०.३० ते १२.३० पर्यंत स्थापित देवतांचे पूजन व अग्निस्थापन दुपारी १२.३० ते १.३० वाजता शिखर प्राणप्रतिष्ठा, दशक स्नान व अभिषेक. दुपारी १.३० ते २.०० वाजेपर्यंत कलशारोहण, दुपारी २.०० ते ३.०० स्थापित देवतांचे हवन, प्रधान हवन, बलीपर्णावर्ती श्रेयदान, नैवेद्य, महाआरती तसेच सायंकाळी ६.०० ते ८.०० वाजता महाप्रसाद वाटप होईल.
या सर्व कार्यक्रमास बहुसंख्य नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन श्री करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिर सेवा समिती, फलटण यांच्यावतीने करण्यात आले आहे.