स्थैर्य, फलटण, दि.२८ : कोरोना वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर श्री कार्तिक स्वामी मंदिर, देवदरी अंभेरी, ता. खटाव येथे दर्शनासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी नित्य पुजेनंतर मंदिर बंद राहणार असल्याने दर्शनासाठी भक्तांनी गर्दी करु नये असे आवाहन श्री कार्तिक स्वामी देवस्थान ट्रस्ट अंभेरीचे मठाधीपती प.पू. परशूरामजी महाराज वाघ यांनी केले आहे.
रविवार दि. 29 रोजी दुपारी 12.47 ते सोमवार दि. 30 रोजी सकाळी 6.00 वाजेपर्यंत श्री कार्तिक स्वामी दर्शन योग आहे. तथापी कोरोनामुळे मंदिर बंद राहणार असल्याने कोणीही भक्तांनी दर्शनासाठी मंदिराकडे येवू नये असे मठाधिपती प.पू. परशूरामजी वाघ यांनी कळविले आहे.