नीरा नदी दत्तघाट येथील श्री दत्त जयंतीचे कार्यक्रम रद्द


 

स्थैर्य, लोणंद, दि.२३: पाडेगाव- नीरा नदी दत्तघाट (ता. खंडाळा) येथील श्री क्षेत्र दत मंदिरात मंगळवारी (ता. 29) दत्त जयंती उत्सवानिमित्त होणारे सर्व कार्यक्रम कोरोना संसर्गामुळे रद्द करण्यात आल्याची माहिती लोणंद पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष चौधरी व श्री दत्त सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रदीप काकडे यांनी दिली. दत्त मंदिराच्या कार्यालयात विश्वस्त मंडळ व लोणंद पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक पार पडली. 

त्या बैठकीत कोरोनाच्या संसर्गामुळे उत्सव साजरा करण्याबाबत शासनाचे असलेल्या निर्बंधामुळे दत्त जयंती उत्सवानिमित्त होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. या वेळी सहायक पोलिस निरीक्षक चौधरी, अध्यक्ष काकडे, उपाध्यक्ष जनार्दन दानवले, खजिनदार नितीन कुलकर्णी, सचिव व्यंकट धायगुडे, पोलिस हवालदार फैय्याज शेख, अविनाश शिंदे, पुजारी सचिन घोडके, समीर पाळधीकर, हरिभाऊ कुलकर्णी, आनंद देशपांडे आदी उपस्थित होते. 

विश्वस्त, पुजाऱ्यांच्या उपस्थितीत धार्मिक विधी पार पाडण्याचाही निर्णय घेण्यात आला. दत्त जयंतीनिमित्त होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याने भाविकांनी दत्त मंदिर व परिसरात गर्दी करू नये, असे आवाहन नितीन कुलकर्णी यांनी केले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!