तालुकास्तरीय भालाफेक स्पर्धेत श्रेया जगताप अव्वल

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य | दि. ११ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या श्री जानाई हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय राजाळे या विद्यालयाची विद्यार्थिनी कु. श्रेया अरुण जगताप हिने मुधोजी महाविद्यालय, फलटण येथे झालेल्या तालुकास्तरीय भालाफेक स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. तिची सातारा येथे होणार्‍या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

क्रीडा शिक्षक श्री. काटकर शशिकांत यांनी तिला मार्गदर्शन केले. प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. गायकवाड मॅडम यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव श्री. सचिन भैय्या सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), श्रीराम एज्युकेशन सोसायटी गव्हर्निंग सदस्य श्री. महेंद्र भैय्या सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व राजाळे गावातील सर्व ग्रामस्थांनी तिचे अभिनंदन केले आहे.

Back to top button
Don`t copy text!