
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. २७ जानेवारी २०२३ | फलटण | केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या आज फलटण येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते, विधानपरिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी उपस्थिती लावली आहे. कार्यक्रमाच्या काही वेळापूर्वी राजे गटाचे कार्यक्रते उपस्थित झाले होता व आता नुकतेच श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे आगमन झाले आहे.
श्रीमंत रामराजे यांच्या उपस्थितीमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या असून विविध चर्चांना उधाण आले आहे. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या सोबत राष्ट्रवादीचे फलटणचे आमदार दीपक चव्हाण यांची उपस्थिती आहे.
