दैनिक स्थैर्य | दि. ३ मार्च २०२४ | बारामती |
महाशिवरात्री एकादशी उत्सवानिमित्त सालाबादप्रमाणे यावर्षीही श्री क्षेत्र मळद ते श्री क्षेत्र वलझडवाडी पायी पालखी सोहळा जय गिरनारी वलझडवाडी दत्त, दत्त नवनाथ हा मंत्र जप करत हजारो भक्तांसह मळद येथून सुरू झाला.
आज दि. ३ मार्च २०२४ रोजी पालखीचा मुक्काम श्री हरीकृपा नगर, बारामती येथे होणार आहे. पुढील मुक्काम दि. ४ मार्च २०२४ रोजी कालभैरव मंदीर पणदरे येथे दि. ५ मार्च २०२४ रोजी मुक्काम सोमेश्वर मंदीर करंजे येथे होईल.
दि. ६ मार्च २०२४ रोजी मुक्काम श्री दत्त घाट, निरा येथे होईल. दिनांक ७ मार्च २०२४ रोजी मुक्काम श्री कालभैरव मंदीर, वाघोशी, ता. खंडाळा येथे होईल. दि. ८ मार्च २०२४ रोजी श्री क्षेत्र वलझडवाडी येथे महाशिवरात्री एकादशीनिमित्त हा सोहळा पोहचणार आहे. तिथे तीन पालखी प्रदक्षिणा होणार आहेत. रात्री १२ वाजता बेलफुले वाहण्याचा कार्यक्रम संपन्न होईल.
पहाटे वलझडवाडी दत्त दत्त नवनाथ टेकडीस तीन प्रदक्षिणा होणार आहेत. सकाळी महाप्रसाद होवून पायी पालखी सोहळा संपन्न होईल. या पालखी सोहळयात एकूण तीन घोडे रिंगण होत आहेत. पहिले रिंगण बारामती मुक्कामी, दुसरे रिंगण सोमेश्वर मंदीर करंजे येथे होईल. तिसरे अश्व रिंगण महाशिवरात्रीदिवशी श्री क्षेत्र वलझडवाडी येथे संपन्न होईल. पायी रथ पालखी सोहळ्यासाठी जेऊर, पैजारवाडी, बारामती, पुणे, फलटण, लोणंद, अहिरे-मोर्वे येथून बहुसंख्येने भक्तगण उपस्थित राहतात.