दैनिक स्थैर्य | दि. ३ मार्च २०२४ | फलटण |
मुंजवडी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन डॉ. अतुल दोशी गुणवरेकर यांच्या पुढाकाराने दोशी गुणवरेकर चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित आणि मुंजवडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी, लायन्स मुधोजी आय हॉस्पिटल, लायन्स क्लब फलटण, फलटण मेडिकल फाउंडेशन (ब्लड बँक), मॅग आणि माऊली फाउंडेशन संचलित जनसेवा डायग्नोस्टिक सेंटर, ग्रामपंचायत मुंजवडी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी, रक्तदान शिबिर, मोफत चष्मे वाटप या शिबिराची शनिवारी अभूतपूर्व प्रतिसाद मिळून यशस्वी सांगता झाली. एक दिवसाच्या शिबिरात ५० जणांनी रक्तदान केले. २७० रुग्णांची नेत्ररोग तपासणी व १२० रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले.
या शिबिरास लायन्स मुधोजी चॅरिटेबल आय हॉस्पिटलचे सेक्रेटरी श्री. चंद्रकांत कदम, लायन्स क्लब फलटणचे अध्यक्ष डॉक्टर तुषार गायकवाड, जनसेवा डायग्नोस्टिक सेंटरचे श्री. तात्या गायकवाड, श्री. पलसे, मुंजवडीचे श्री. कमलाकर ठणके, श्री. सचिन वाघमोडे, श्री. रमेश पवार, श्री. विठ्ठल घाडगे, श्री. वाघमोडे, श्री. आशोक घाडगे, अमोल इंगळे, रणजित गायकवाड, मुंजवडीकर ग्रामस्थ, दोशी गुणवरेकर चॅरिटेबल ट्रस्टचा परिवार व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात साजरे झाला.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी अनेक व्यक्तींचा सहभाग मिळाला. सर्वांनी ‘जनसेवा हीच ईश्वरसेवा आह’, हे खरे करून दाखवले. तसेच सर्वांनी ‘जिथे कमी तिथे मी’ या भावनेने सेवा केली. या कार्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी झालेल्या सर्वांचे आभार दोशी गुणवरेकर चॅरिटेबल ट्रस्ट, फलटण यांनी मानले.