जागतिक महिला दिनानिमित्त श्रद्धा एज्युकेशन सोसायटीकडून फॅशन डिझायनिंग प्रशिक्षणात फी मध्ये मोठी सवलत; विविध प्रकारचे ब्लाऊज व ड्रेसचे प्रशिक्षण


दैनिक स्थैर्य | दि. ४ मार्च २०२३ | फलटण |
जागतिक महिला दिना (८ मार्च) निमित्त कापशी (ता. फलटण) येथील श्रद्धा एज्युकेशन सोसायटीकडून ६ मार्च २०२३ ते ३१ मार्च २०२३ पर्यंत फॅशन डिझायनिंग प्रशिक्षण फीमध्ये खास सवलत देण्यात आली आहे. या खास सवलतीचा जास्तीत जास्त महिला, मुलींनी फायदा घ्यावा, असे आवाहन श्रद्धा एज्युकेशन सोसायटीकडून करण्यात आले आहे.

ब्लाऊज प्रशिक्षण
या फॅशन डिझायनिंग प्रशिक्षणात ब्लाऊजमध्ये साधा ब्लाऊज (साधी बाही), हाफ कटोरी ब्लाऊज (ओव्हरलॅप बाही), फुल कटोरी ब्लाऊज (मेघा बाही), प्रिन्सेस ब्लाऊज (फुल बाही), अस्तर ब्लाऊज (फुग्याची बाही), बोटनेक ब्लाऊज शिकविले जाणार आहेत. तसेच प्रत्येक ब्लाऊजला वेगवेगळी बाही, गळ्यांचे विविध प्रकार व वेगवेगळ्या डिझाईन्स शिकविल्या जातील.

ड्रेस प्रशिक्षण
ड्रेस प्रशिक्षणात ए लाईन टॉप (साधी सलवार), शॉर्ट टॉप (सेमी पटियाला सलवार), अंब्रेला घेर टॉप (रिंकल सलवार), स्टॅण्ड कॉलर टॉप (धोती पटियाला सलवार), प्रिन्सेसलाईन टॉप (पॅरलल सलवार). डे्रसचे सर्व प्रकार कटींग व शिलाईचे शास्त्रोक्त प्रशिक्षण दिले जाईल.
या प्रशिक्षणात खास आकर्षण हे अनारकली टॉप व प्रिन्सेस ब्लाऊज असणार आहे.

ब्लाऊजचा प्रशिक्षण कालावधी एक महिन्याचा असून फी फक्त रु. ५००/- असणार आहे. तर ड्रेसचा प्रशिक्षण कालावधी एक महिन्याचाच असून फी फक्त रु. १०००/- असणार आहे.

या फॅशन डिझायनिंगचे प्रशिक्षण समर्थ बैठक हॉल (भगवान मिस्त्री), काळुबाई मंदिराशेजारी (उपसरपंच चहा, काळुबाई चौक), साखरवाडी-खामगाव रोड, साखरवाडी, ता. फलटण, जि. सातारा येथे दिले जाणार आहे.

अधिक माहितीसाठी कृष्णात गुरव (मोबा. ९४२३८७९८४७, ९०११७८६९७५) यांच्याशी संपर्क साधावा.


Back to top button
Don`t copy text!