दैनिक स्थैर्य । दि.०२ फेब्रुवारी २०२२ । फलटण । सातारा जिल्ह्याचे नेते व विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर टिका करताना विरोधकांनी स्वत:ची केलेली कामे दाखवावित आणि मगच श्रीमंत रामराजेंवर टिका करावी, अशी प्रतिक्रिया श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे कट्टर समर्थक किरण निंबाळकर यांनी दिलेली आहे.
कृष्णा खोर्याच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यात धरण तयार करून पुर्णत्वास नेहले. त्यासोबतच सातारा जिल्ह्यामध्ये कृष्णा खोर्याच्या माध्यमातून विविध सिंचन प्रकल्प पुर्णत्वास नेहलेले आहेत. त्यांच्यावर टिका करताना स्वत:ची विकासकामे तपासुन पाहवित असेही निंबाळकर यांनी यावेळी स्पष्ट केले.