धक्कादायक! कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी महिलांकडून पैसे; पालकमंत्री लक्ष देऊन कारवाई करणार का ?


दैनिक स्थैर्य । दि. 12 मे 2025 । साखरवाडी । साखरवाडी ता. फलटण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दि. ११ रोजी फलटण तालुक्यातील विविध गावांमधून ४० हुन अधिक महिला या प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी आल्या होत्या. या महिलांमध्ये ज्यांची सिझर पद्धतीने प्रसूती झाली आहे. अशा महिलांकडून प्रत्येक सिझर साठी १ हजार या ‘दरानुसार’ वैद्यकीय अधिकार्यांनी पैसे घेतले असल्याची माहिती समोर येत आहे.

यामध्ये दोन प्रसूती सिझर असणाऱ्या महिलांकडून २ तर तीन प्रसूती सिझर झाले. सकाळी महिला रुग्णालयात दाखल झाल्या झाल्या; आशा सेविकांच्या माध्यमातून घेतले हे हे पैसे कशासाठी त्याची पावती मिळणार का ? अशा मागणी काही रुग्णांच्या नातेवाईकांनी केल्यानंतर ते ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरांना द्यावे लागतात व त्याची कोणती पावती मिळत नाही. असे त्यांच्याकडून सांगण्यात आले; या धक्कादायक प्रकाराबाबत सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई व सातारा जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग या प्रकारची चौकशी करून या अधिकाऱ्यावर कारवाई करणार ? हा प्रश आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाच्या वतीने शासकीय रुग्णालयांमध्ये सर्वसामान्य कुटुंब ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. अशांसाठी शासनाच्या वतीने विविध उपचार, गोळ्या औषधे व शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात. त्यानुसार कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी केली जाते. अधिकाधिक नागरिकांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया या शासकीय रुग्णालयात कराव्यात म्हणून शासन गाव पातळीवर विशेष प्रयत्नशील असते. प्रत्येक गावामध्ये असणाऱ्या आशा सेविका या गावामध्ये दोन व अधिक अपत्य असणाऱ्या कुटुंबीयांचा सर्वे करून त्यांची माहिती घेऊन त्यांना शासकीय रुग्णालयात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्याचे फायदे समजावून सांगत असतात. त्याचाच परिपाक असा की सध्या कुटुंब नियोजनासाठी खाजगी रुग्णालयात हजारो रुपये खर्च येत असल्यामुळे सर्वसामान्य व सधन कुटुंबातील महिलांचा जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये आयोजित असणाऱ्या कॅम्पमधून कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी कल वाढलेला आहे. मात्र संपूर्ण जिल्ह्यात एकमेव अशा स्वरूपाच्या शस्त्रक्रिया करीत असल्याने ज्या महिलांची प्रसूती ही सिझर पद्धतीने झाली आहे; अशा महिलांच्या प्रत्येक प्रसूतीला प्रत्येकी १ हजार या दरानुसार मागील अनेक दिवसांपासून पैसे घेत आहेत.

आशा सेविकांना अशा महिलांकडून तुम्हाला प्रत्येकी सिजर साठी हे पैसे द्यावे लागतील व ते पैसे नंतर तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत; असे सांगितले जाते. सकाळी महिला रुग्णालयात दाखल झाल्यानंतर जर आशा सेविकांकडे पैसे दिले तरच त्या महिलांना भुलीचे इंजेक्शन दिले जाते. अन्यथा अशा महिलांना ऑपरेशन साठी वेळ प्रसंगी टेबल वरून खाली उतरवण्याच्या सुद्धा घटना या आधी घडल्या असल्याचे एका वैद्यकीय कर्मचाऱ्याने चर्चा करताना स्पष्ट केले आहे.


Back to top button
Don`t copy text!