
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । 12 मे 2025। फलटण । येथील नरसिंह जयंती उत्सव मंडळाच्यावतीने नरसिंह चौक येथेे नरसिंह जयंती उत्सवाची सुरुवात बुधवार दि. 07 रोजी ध्वजपूजन करून करण्यात आली. रविवार दि. 11 रोजी सायंकाळी जन्म काळ मोठ्या उत्साहात भावीक भक्तांच्या उपस्थितीत करण्यात आला. यानिमित्ताने मोठ्या प्रमाणात फटाक्यांच्या आतषबाजी करण्यात आली. यावेळी नरसिंह मंदिर फुलांच्या माळांनी तसेच लाईटच्या माळांनी सजवण्यात आले होते.
नरसिंह जयंतीनिमित्ताने सोमवार दि. 12 रोजी सायंकाळी 5 वाजता सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्या आले आहे. महापूजा झाल्यानंतर 7 ते 10 या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे या उत्सव सोहळ्यामध्ये ज्या भाविकांना सहभागी व्हायचे आहे त्यांनी उमेश शिंवदे मो. नं. 90 11 74 70 32 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन नरसिंह जयंती मंडळाने केले आहे.
