शिवरूपराजे अजितदादांच्या भेटीला; रणजितदादांची सुद्धा उपस्थिती

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. २८ जानेवारी २०२५ | फलटण | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली असून यावेळी माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. सदरील बैठक खाजगी असून यामध्ये राजकीय विषय नसल्याचे मत श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांनी स्पष्ट केले.

मुंबई येथे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांची सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खरडेकर यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

याबाबत दैनिक “स्थैर्य”शी बोलताना सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर म्हणाले की; आमचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांना आमचे सुपुत्र श्रीमंत सिद्धसेनराजे खर्डेकर यांच्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी मी गेलो होतो. यावेळी कोणतेही राजकीय चर्चा झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!