शिवभोजन थाळी 15 मे 2021 पर्यंत नि:शुल्क उपलब्ध; जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे आवाहन


स्थैर्य, सातारा, दि. ०४ : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मजूर, स्थलांतरीत, बेघर तसेच बाहेरगावचे विद्यार्थी यांचे जेवणाअभावी हाल-अपेष्टा होवू नये यासाठी ब्रेक द चेन अंतर्गत शिवभोजन थाळी 15 मे 2021 पर्यंत नि:शुल्क उपलब्ध करुन देण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांनी दिली आहे. भविष्यातही ब्रेक द चेन अंतर्गत शासनाकडून शिवभोजन थाळी नि:शुल्क उपलब्ध करुन देण्यास मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. तरी सातारा जिल्ह्यातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी कार्यरत असलेल्या शिवभोजन केंद्रांवर शिवभोजन थाळीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!