धम्मदान हे सर्वश्रेष्ठ दान; घोरपडे यांनी दिला महत्त्वाचा संदेश

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

फलटणमध्ये लालासो आढाव यांच्या प्रथम स्मृतिदिनी धम्मप्रबोधनपर व्याख्यान झाले; धम्मविचार समाजापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन करत शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.

स्थैर्य, फलटण, दि. 18 नोव्हेंबर : लालासो आढाव यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त 18 नोव्हेंबर रोजी फलटण येथे धम्मप्रबोधनपर व्याख्यान आणि अभिवादन कार्यक्रम झाला. भारतीय बौद्ध महासभेचे सातारा जिल्हा पूर्व संस्कार सचिव सोमीनाथ घोरपडे यांनी धम्मदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्याचा संदेश दिला, तर कुटुंबीयांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.

धम्मदान आणि जीवनदृष्टी

सोमीनाथ घोरपडे म्हणाले की, भगवान गौतम बुद्धांनी धम्मदानाला सर्वश्रेष्ठ मानले आहे. अन्न, वस्त्र, औषध आणि निवारा या दानांपेक्षा धम्मदान माणसाला जीवनाकडे पाहण्याची नवी दृष्टी देते आणि दुःखमुक्तीचा मार्ग दाखवते. धम्माचा विचार इतरांपर्यंत पोहोचवणे हेच खरे धम्मदान आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. धम्मपदातील गाथेचा संदर्भ देत त्यांनी धम्मश्रवणातून होणारे परिवर्तन आणि समाजकल्याणाची प्रेरणा विशद केली.

आदरांजली आणि शैक्षणिक उपक्रम

लालासो आढाव यांच्या कार्याला उजाळा देत आनंदराव आढाव, सचिन मोरे, राजू गायकवाड, दीपक आढाव, शिवाजी लंगुटे, जी. पी. गावडे आणि कांतालाल आढाव यांनी आदरांजली वाहिली. महावीर भालेराव यांनी आशीर्वाद गाथा व सरणत्तय घेऊन श्रद्धांजली अर्पण केली. या प्रसंगी बाबासाहेब जगताप, भीमराव लोंढे, विजय भोसले, अरविंद आढाव, विश्वास भोसले, ऋषिकेश आढाव, मनोज आढाव, सागर वाघमोडे, संग्राम धाईंजे आणि प्रमोद बाबर यांच्यासह कुटुंबीय व नागरिक उपस्थित होते. स्मृतिप्रीत्यर्थ कुटुंबीयांनी बालसंस्कार शिबिरातील विद्यार्थ्यांना बस्कर पट्ट्या, वीस खुर्च्या आणि शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप केले.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!