फलटण हेरिटेज हाफ मॅरेथॉनचे आयोजन; नोंदणीची अंतिम मुदत कधी?

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

फलटणमध्ये १३ डिसेंबर रोजी हेरिटेज हाफ मॅरेथॉन स्पर्धा होणार असून २० नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करता येईल. विजेत्यांना रोख बक्षिसे व वेलकम किट मिळणार आहे.

स्थैर्य, दुधेबावी, दि. 17 नोव्हेंबर : फलटण रनर्स फाउंडेशनतर्फे रविवार, दि. 13 डिसेंबर रोजी फलटण हेरिटेज हाफ मॅरेथॉनचे दुसरे पर्व होणार आहे. सजाई गार्डन ते गिरवी रोड या मार्गावर 5, 10 आणि 21 किलोमीटर अशा तीन गटांत ही स्पर्धा चालेल. स्पर्धेसाठी 20 नोव्हेंबरपर्यंत नाव नोंदणी करता येईल.

स्पर्धेचे स्वरूप आणि वयोगट

शहराचा ऐतिहासिक वारसा मांडणे आणि नागरिकांमध्ये शारीरिक तंदुरुस्तीबाबत जागृती करणे, हा या स्पर्धेचा मुख्य हेतू आहे. 5 किलोमीटरची फन रन खुल्या गटात होईल, तर 10 व 21 किलोमीटरसाठी 18 ते 34, 35 ते 49 आणि 50 वर्षांवरील असे वयोगट आहेत. पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.

बक्षिसे आणि सहभागाचे आवाहन

10 व 21 किलोमीटरच्या स्पर्धेत पहिल्या तीन क्रमांकांना अनुक्रमे 10 हजार, 7 हजार आणि 5 हजार रुपये रोख व मेडल दिले जाईल. प्रत्येक सहभागी धावपटूला मेडल तसेच टी-शर्ट, बॅग आणि बिब असलेले वेलकम किट मिळेल. फाउंडेशनचे अध्यक्ष रविंद्र शिंदे यांनी धावपटूंना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. या वेळी नानासाहेब काळुखे, प्रवीण घोरपडे, अनुजा त्रिपुटे, अमित माने, चंद्रकांत जगदाळे, चंद्रकांत सापते, अभिजीत शेंडे आणि पराग मासाळ उपस्थित होते.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!