
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि.१७ फेब्रुवारी २०२१ । फलटण । संभाजी ब्रिगेड विडणी – माझेरी यांच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी कोविड निर्बंध पाळून, शासनाने घालुन दिलेले नियम व अटी सांभाळून शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. शिवजयंती उत्सवानिमित्त शनिवार दि. १९ फेब्रुवारी रोजी
सायंकाळी ठीक ७ विडणी, ता. फलटण येथे, महाराष्ट्रात सध्या गाजत असलेल्या लोकप्रिय मराठी वेब सिरीज चांडाळ चौकडी मधील प्रमुख कलाकार विष्णू भारती (पाटील), गणेश शिंदे (पै. गणा) आणि आमिर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात येणार आहे.
विडणी व पंचक्रोशीतील शिवप्रेमी नागरिक, तरुण वर्ग आणि ग्रामस्थांनी या कार्यक्रमास अवश्य उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
