
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. २२ एप्रिल २०२३ | फलटण |
फलटणचे उपनगर समजले जाणार्या कोळकी (ता. फलटण) येथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी व ग्रामस्थांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. छत्रपतींचे विचार, वारसा, धाडस, शौर्य सर्वांनी आत्मसात करावे, असे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले.
या शिवजयंती उत्सवास माजी प्राचार्य जगदाळे, अॅड. सागर सस्ते, जयकुमार शिंदे, रणजित जाधव, यशवंत जाधव, अभिजीत भोसले, विपुल येवले, धर्मराज देशपांडे, अनिकेत जगदाळे, प्रसाद सावंत, प्रविण सावंत, सत्यजित काटकर, विठ्ठल केंजळे व कोळकी ग्रामस्थ उपस्थित होते.
