
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
स्थैर्य, फलटण, दि. १६ : सध्या कोरोनामुळे संपूर्ण महाराष्ट्रात कलम १४४ लागू करण्यात आलेले आहे. या मुळे हातावरचे पोट असणाऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने शिवभोजन थाळी मोफत सुरु करण्यात आलेली आहे. या मध्ये फलटण शहरामधील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अन्नपूर्णा शेतकरी कँटीन, महात्मा फुले चौक येथील हॉटेल अजिंक्य व फलटण बसस्थानकाच्या समोर असणाऱ्या हॉटेल मल्हार येथे शिवभोजन थाळी उपलब्ध केलेली आहे. सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत शिवभोजन थाळी हि उपलब्ध राहणार आहे, अशी माहिती फलटणचे निवासी नायब तहसीलदार आर. सी. पाटील यांनी दिली.



