मलटणच्या काळुबाई नगरात निवारा घर सुरू; डॉ. जे.टी. पोळ यांच्या हस्ते उद्घाटन


दैनिक स्थैर्य | दि. १३ मार्च २०२३ | फलटण |
मोरेश्वर शिक्षण व सामाजिक संस्था फलटण महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून काळुबाई नगर, मलटण येथे निवारा घर सुरू करण्यात आलेले आहे. या संस्थेच्या माध्यमातून गेल्या ९ वर्षांपासून या बेघर, निराधार लोकांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी ‘निवारा घर’ चालवले जात आहे. या ठिकाणी बेघर लोकांसाठी अन्न, निवारा, पाणी यांची व्यवस्था करण्यात येत आहे. काळुबाई नगर, मलटण येथे निवारा घर सुरू करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे निकोप हॉस्पिटलचे सर्वेसर्वा प्रख्यात हृदयरोगतज्ञ डॉ. जे. टी. पोळ यांच्या हस्ते बेघर निवारा घराचे उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष श्री. हनुमंत मोरे यांनी प्रास्ताविक केले व फलटण शहरातील बेघर निराधार लोकांचे आरोग्याचे व राहण्याचे होत असलेले हाल हे त्यांनी त्यांच्या खास भाष्यशैलीत उपस्थितांसमोर मांडले. यावेळी उपस्थितांच्या मनाला भावणारे असे त्यांनी त्यांचे अनुभव व्यक्त केले.

प्रमुख पाहुणे डॉ. जे.टी. पोळ यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले आणि या बेघर निराधारांसाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन या लोकांसाठी संस्थेस मदत करण्याचे आवाहन केले. शेवटी डॉ जे. टी. पोळ यांनी मला जेवढे शक्य होईल तेवढे मी या संस्थेस मदत करणार असल्याचे सांगितले.

यावेळी ज्येष्ठ माजी सैनिक अरुण गायकवाड, माजी सैनिक काशिनाथ गायकवाड, नगरपालिकेचे मोहनराव शिंदे, शशिकांत शिरतोडे तसेच मोहनराव आलगुडे, ज्येष्ठ नागरिक एकनाथ कुंभार, सचिव अनिल कुंभार, सदस्या सौ. मोरे मॅडम व संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. सचिव अनिल कुंभार यांनी सर्वांचे आभार मानले.


Back to top button
Don`t copy text!