
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. २८ जानेवारी २०२४ | फलटण |
अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक, केंद्र फलटणचा वर्धापन दिन आणि शारदा पुरस्कार वितरण समारंभ बुधवार, दिनांक ३१ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता नवलबाई मंगल कार्यालय, फलटण येथे आयोजित केला आहे.
यावर्षीचा कै. सत्यभामाबाई लेले यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा श्री शारदा पुरस्कार दहिवडी येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सौ. पद्माताई कुबेर यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सौ. हेमलता गुळवणी, प्राचार्य उषाताई कुलकर्णी (पुणे), तसेच महाराष्ट्र शासनाचा वृक्षमित्र पुरस्कार सन्मानित डॉ. महेश बर्वे यांची या कार्यक्रमास विशेष उपस्थिती आहे.
सर्वांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित रहावे, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.
