आळजापूरच्या शेतकऱ्याचे टळले मोठे नुकसान; शरयूच्या अग्निशमन दलाची तत्परता

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

शरयू साखर कारखान्याच्या कापशी येथील अग्निशमन दलाने आळजापूर येथील शेतकऱ्याच्या ऊसाला लागलेली आग तातडीने आटोक्यात आणल्याने लाखोंचे नुकसान टळले आहे.

स्थैर्य, फलटण, दि. १८ नोव्हेंबर : फलटण तालुक्यातील आळजापूर येथील शेतकरी अजित नलवडे यांच्या ऊस पिकाला अचानक आग लागल्याची घटना घडली. दुष्काळी परिस्थितीत मोठ्या कष्टाने जोपासलेले आणि हातातोंडाशी आलेले ऊस पीक आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्याची भीती निर्माण झाल्याने शेतकऱ्यासमोर मोठे संकट उभे राहिले होते.

आग विझवण्यात यश

ही माहिती मिळताच शरयू साखर कारखान्याच्या कापशी येथील अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत अत्यंत वेगाने आग आटोक्यात आणली. अग्निशमन दलाच्या या तत्परतेमुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे संभाव्य नुकसान टळले आणि मोठा अनर्थ रोखण्यात यश आले.

ग्रामस्थांकडून कौतुक

या संकटसमयी मदतीला धावून आल्याबद्दल शेतकरी अजित नलवडे तसेच आळजापूर परिसरातील ग्रामस्थांनी शरयू साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक युगेंद्र पवार व कारखाना व्यवस्थापनाचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात सदैव सहभागी होणाऱ्या या कार्याच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!