दैनिक स्थैर्य | दि. 25 ऑगस्ट 2023 | फलटण | माजी केंद्रीय कृषी मंत्री व राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार हे त्यांच्या नियोजित कार्यक्रमाच्या निमित्ताने दहिवडी येथे जात असताना फलटण येथील नाना पाटील चौक येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी माजी मंत्री व आमदार शशिकांत शिंदे, जेष्ठ नेते सुभाष शिंदे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, युवा नेते तेजस शिंदे, राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस राजाभाऊ निकम यांच्यासह राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
सर्वसामान्य जनता शरद पवार साहेबांच्या सोबतच : आमदार शशिकांत शिंदे
आज कोल्हापूर येथे महाविकास आघाडीची सभा आहे. त्या सभेसाठी जात असताना दहिवडी येथे विविध विकासकामांचे उद्घाटन हे खा. शरद पवार साहेबांच्या हस्ते आहे. फलटण तालुक्याच्या वतीने आज नाना पाटील चौक येथे भव्य – दिव्य स्वागत करण्यात येत आहे. खासदार शरद पवार साहेबांच्या दौऱ्याबद्दल नेहमीच सर्वसामान्य जनतेमध्ये मोठी उत्सुकता असते. आपल्या राज्यामध्ये ज्या प्रकारे पक्ष फोडण्याचे काम सुरु आहे व झाले आहे; याची चीड सर्वसामान्य जनतेमध्ये आहे. राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी खासदार शरद पवार साहेबांचा दौरा होत आहे; तिथे मोठ्या प्रमाणावर जनता त्याला प्रतिसाद देत आहे. नेते गेले तरी सर्वसामान्य जनता हि पवार साहेबांच्या सोबतच आहे; हे चित्र उभ्या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत आहे. येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व राष्ट्रीय काँग्रेस पक्ष मिळून महाविकास आघाडीच्या माध्यमातून एक वेगळे चित्र देशामध्ये व राज्यामध्ये उभा करण्याचे काम करणार आहे. भविष्य काळामध्ये लोकसभेच्या माध्यमातून फलटणला संधी द्यावी; अशी आग्रही मागणी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे केली होती; त्याला ते सुद्धा अनुकूल होते. लोकसभेला फलटणला संधी देण्यासाठी सर्वच जण आग्रही असताना दुर्दैवाने पक्षामध्ये आहे. जे गेले आहेत त्यांनी लोकशाही मध्ये त्यांचा अधिकार आहे. जे राहिले आहेत; ते पवार साहेबांच्या सोबत ठामपणे आहेत. सातारा जिल्ह्यामध्ये कुठे व कधी सभा घ्यायची हे पवार साहेब ठरवणार आहेत. जी सभा सातारा जिल्ह्यामध्ये होईल; ती भव्य दिव्य होईल; असा विश्वास यावेळी माजी मंत्री व आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना आमदार शशिकांत शिंदे म्हणाले कि, पवार साहेबांचे सातारा जिल्हा व फलटणवर विशेष प्रेम आहे. सातारा जिल्ह्याचे व पवार साहेबांचे एक आपुलकीचे नाते आहे. २०२४ साली जर भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये आली तर देशामध्ये लोकशाही जिवंत राहील कि नाही ? असा प्रश्न आहे. भारतीय जनता पार्टीच्या विरोधातील सुरवात हि फलटणमधून व्हावी अशी इच्छा आमच्या सारख्या कार्यकर्त्याची आहे. सातारा जिल्ह्यामध्ये व फलटणमध्ये वातावरण बदलल्याशिवाय राहणार नाही; हि फक्त सुरवात आहे. आजची सुरवात असताना आज शेकडो कार्यकर्ते हे स्वयंसुफ्रतीने इथे आले आहेत. कोणाचेही नियोजन नाही; कोणीही बोलावले नाही तरीही कार्यकर्ते आज आले आहेत. महाविकास आघाडीच्या माध्यमातून वात आहे ती आता पटल्याशिवाय राहणार नाही.
अडचणी असल्याने काही जण सत्तेत : सुनील माने
सातारा जिल्ह्यामध्ये राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर खा. शरद पवार साहेबांच्याबद्दल मोठा आदर आहे. सातारा जिल्ह्यामध्ये शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचाराने राजकारण झाले पाहिजे. यासाठीच पवार साहेब या वयामध्ये उभ्या महाराष्ट्रात दौरा आखला आहे. देशामध्ये गेल्या ९ वर्षांमध्ये राजकारणाची दशा जी झाले आहे; त्याला फक्त भारतीय जनता पार्टी कारणीभूत आहे. हे लोकशाहीसाठी घातक आहे. याला विरोध करण्यासाठी पवार साहेबांच्या माध्यमातून आम्ही कार्यरत राहणार आहोत. जर २०२४ साली भारतीय जनता पार्टीचे सरकार पुन्हा आले तर या देशामध्ये लोकशाही जिवंत राहील कि नाही ? हा प्रश्न सुद्धा उपस्थित राहत आहे. ज्या सरकारी संस्था आहेत त्याच्या माध्यमातून विरोधी पक्षाला सातत्याने त्रास देण्याचे काम भारतीय जनता पार्टी करत आहे. लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्ष व विरोधी पक्ष हे फार महत्वाचे घटक आहेत. जर देशामध्ये आपण बघितले तर विरोधी पक्ष नेते राहिला नाही पाहिजे हि भूमिका भारतीय जनता पार्टीच्या सरकारची आहे. राजकारणामध्ये प्रत्येकाला निर्णय घेण्याचे स्वातंत्र आहे. कुणाला सत्ता पाहिजे असे ? कुणाच्या इतर अडचणी असतील तर त्यासाठी ते गेले असतील; परंतु सामान्य माणूस हा पवार साहेबांच्या विचाराशी ठाम आहे; असे मत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी स्पष्ट केले.