श्रीमती शांताबाई गणपतराव धुमाळ तथा काकी यांचे वृद्धापकाळाने निधन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 11 जानेवारी 2025 | फलटण | आदर्की बुद्रुक ता. फलटण गावचे माजी सरपंच विलासराव गणपतराव धुमाळ यांच्या मातोश्री श्रीमती शांताबाई गणपतराव धुमाळ तथा काकी यांचे काळूबाईनगर, मलठण, फलटण येथील राहत्या घरी अल्पशा आजाराने आज शुक्रवार दि. १० जानेवारी रोजी निधन झाले.

यावेळी माजी आमदार दिपकराव चव्हाण, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, सुभाषराव धुमाळ, बाळासाहेब कासार, विलासराव नलवडे, बाळासाहेब नलवडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी काळूबाईनगर, मलठण, फलटण येथील राहत्या घरी अंत्यदर्शन घेऊन धुमाळ कुटुंबीयांचे सांत्वन केले.

४५ एकर जमीन त्वरित विकणे आहे

फलटण - सातारा रोडवर मलवडी गावाच्या
रस्त्यालगत, निसर्गरम्य, वीज, पाणी असलेली
प्रदूषणमुक्त ४५ एकर जमीन योग्य किमतींस
त्वरित विकणे आहे.

संपर्क : 8888006611 (WhatsApp)

त्यानंतर शुक्रवारी सकाळी ११ वाजता राहत्या घरापासून निघालेल्या अंत्ययात्रेत विविध क्षेत्रातील मान्यवरांसह, आप्तेष्ट, मित्रमंडळी, फलटण व आदर्की बु|| पंचक्रोशीतील ग्रामस्थ सहभागी झाले होते. वैकुंठ स्मशानभूमी, फलटण येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


Back to top button
Don`t copy text!