शानभाग विद्यालयाचा 10 वीचा निकाल शंभर टक्के

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Channel Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । 15 मे 2025। सातारा । के.एस.डी. शानभाग विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, सातारा या विद्यालयाचा मार्च 2025 मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल यंदा शंभर टक्के लागला आहे.

एकूण 136 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. यापैकी 29 विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा अधिक गुण प्राप्त करीत उल्लेखनीय यश संपादन केले. 73 विद्यार्थी 75% पेक्षा अधिक, तर 34 विद्यार्थी 60% पेक्षा अधिक गुणांनी उत्तीर्ण झाले. एकूण 96 विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रातील ग्रेस मार्क्स, तर 19 विद्यार्थ्यांना चित्रकला विषयाचे गुण प्राप्त झाले.

गुणानुक्रमे यशस्वी विद्यार्थी:प्रथम क्रमांक: आरोही भरत सूर्यवंशी (जिल्हास्तरीय फुटबॉल खेळाडू ) – 99%.द्वितीय क्रमांक: सुभाषी जगदीश शिंदे (राज्यस्तरीय जलतरणपटू) – 97.80%..तृतीय क्रमांक (विभागून): अनुष्का विजय शिंदे (जिल्हास्तरीय क्रिकेटपटू) व कैवल्य प्रशांत लोहार (जिल्हास्तरीय बुद्धिबळपटू) – 97.40%., कैवल्य यास गणित विषयात 100 पैकी 100 गुण मिळाले आहेत.चतुर्थ क्रमांक: अदिती प्रवीण बर्गे – 97%. समाजशास्त्र या विषयात 100 पैकी 100 गुण.पाचवा क्रमांक: प्रांजल प्रमोद देवकुळे – 96.80%. तिला समाजशास्त्र विषयात 100 पैकी 100 गुण प्राप्त झाले.

या यशामागे विद्यार्थ्यांचे अथक परिश्रम, शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन, पालकांचे सहकार्य आणि शाळेच्या व्यवस्थापनाचे मोलाचे योगदान आहे. संस्थेचे संस्थापक रमेश शानभाग , संचालिका सौ. आंचल घोरपडे, विश्वस्त संकेत शानभाग, प्राचार्या रेखा गायकवाड, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक भाग्येश कुलकर्णी, क्रीडा विभागप्रमुख अभिजीत मगर सर तसेच सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व पालक वर्ग यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.


Back to top button
Don`t copy text!