
दैनिक स्थैर्य । 9 जून 2025। सातारा । सातारा शहरातील प्रमुख अशा राजवाडा परिसरात बस स्थानकापासून अगदी मोती चौकाचे अंतरा दरम्यान समर्थ मंदिर बाजूने येणार्या गटाराचे पाणी दररोज सकाळी चार ते पाच तास असे वाहत असते. या गटारगंगेच्या डबक्यातूनच ये- जा करावी लागते. नगरपालिकेचे आरोग्य विभागाचे कर्मचारी दररोज यासाठी राबवत असतात मात्र या कामाची दुरुस्ती अद्यापही झालेली दिसून येत नाही. त्याचे हे बोलके छायाचित्र रविवारी सकाळी आपल्या कॅमेरात टिपले आहे पत्रकार अतुल देशपांडे सातारा यांनी.