
दैनिक स्थैर्य । 9 जून 2025। सातारा । सातार्यासह इतर नऊ जिल्ह्यांतील कामगार विमा योजनेच्या रुग्णालयांसाठी जमीन देण्यास आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली. या बैठकीत सातार्यासह छत्रपती संभाजीनगर, बिबवेवाडी (पुणे), अहिल्यानगर, सांगली, अमरावती, बल्लारपूर (चंद्रपूर), सिन्नर (नाशिक), बारामती (पुणे), पनवेल (रायगड) येथील प्रस्तावित रुग्णालयांसाठीही शासकीय जमीन उपलब्ध करूनदेण्यास तत्त्वतः मान्यता देण्यात आली.
राज्यातील नऊ ठिकाणी अशी रुग्णालये उभारण्याचे प्रस्तावित आहे. त्यानुसार विबवेवाडी (पुणे), अहिल्यानगर, सांगली, अमरावती, बल्लारपूर (चंद्रपूर), सिन्नर (नाशिक), बारामती (पुणे), सातारा आणि पनवेल (रायगड) येथील रुग्णालयांना आवश्यक जमीन उपलब्ध करून देण्यास बैठकीत तत्त्वतः मान्यता देण्यात आली. सातार्यातील एमआयडीसीतील ईएसआयसीच्या रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लागला आहे.