श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाच्यावतीने वारकर्‍यांची सेवा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य । दि. ०६ जुलै २०२२ । फलटण । फलटण शहरातील अहिल्यादेवी नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाच्यावतीने वारकर्‍यांची मनोभावे सेवा करण्यात आली.

आषाढी वारीनिमित्त संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर माऊलींचा पालखी सोहळा यंदा दि.1 व 2 जुलै रोजी दोन दिवसाच्या मुक्कामासाठी फलटण नगरीत विसावला होता. या मुक्कामादरम्यान शहरात विविध सामाजिक संस्था, सार्वजनिक मंडळे यांच्यावतीने प्रतीवर्षी विविध माध्यमातून वारकर्‍यांची सेवा केली जात असते. यामध्ये श्री स्वामी समर्थ सेवा मंडळही आघाडीवर असते.

यंदा पालखी सोहळ्यादरम्यान श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाच्यावतीने श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरात वारकर्‍यांसाठी चहा, नाष्टा व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाचे अध्यक्ष संजय चोरमले व त्यांच्या सहकार्‍यांनी या उपक्रमासाठी परिश्रम घेतले.

Back to top button
Don`t copy text!