ज्येष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव यांना विधानसभेत पाठवा : सुधीर अहिवळे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ०६ नोव्हेंबर २०२४ | फलटण | फलटण शहरासह तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये दांडगा जनसंपर्क असणारे व तालुक्यातील प्रत्येक गावाची माहिती असणारे गावातील समस्यांची जाण असणारे जेष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव हे फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमधून संविधान संघर्ष समितीच्या माध्यमातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. तरी ज्येष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव यांना भरघोस मतांनी विजयी करावे! असे आवाहन संविधान संघर्ष समितीचे समन्वयक सुधीर अहिवळे यांनी केले आहे.

यावेळी बोलताना सुधीर अहिवळे म्हणाले की; 2009 साली फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची निर्मिती झाल्यानंतर फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव करण्यात आला होता. तेव्हापासून आजपर्यंत कोणत्याही प्रमुख राजकीय पक्षांनी बौद्ध समाजातील उमेदवाराला उमेदवारी दिलेली नव्हती. आगामी काळामध्ये पुन्हा मतदार संघाची पुनर्रचना होण्याची दाट शक्यता असल्याने यावेळी संविधान संघर्ष समितीच्या माध्यमातून “एकच निर्धार; बौद्ध आमदार” ही चळवळ उभारण्यात आलेली होती. याचेच पुढचे पाऊल म्हणून संविधान संघर्ष समितीच्या वतीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तिकिटावर जेष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव यांना उमेदवारी मिळालेली आहे.

संपूर्ण समाज हा ज्येष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव यांच्या पाठीशी ठामपणे उभा असून शहरासह तालुक्यातील नागरिकांनी सुद्धा प्रा. रमेश आढाव यांना भरघोस मतांनी विजयी करावे. गत 30 ते 35 वर्षांच्या पत्रकारितेच्या माध्यमातून प्रा. रमेश आढाव यांना तालुक्यातील प्रश्नांची चांगली जाण आहे. जे प्रश्न राजकीय नेत्यांच्या माध्यमातून सुटलेले नाही ते प्रश्न आढाव सरांनी पत्रकारितेच्या माध्यमातून सोडवलेले आहेत व यापुढे सुद्धा त्यांना विधानसभेमध्ये फलटणकर जनतेने पाठवल्यानंतर फलटणचा सर्वांगीण विकास केल्याशिवाय आढाव सर शांत बसणार नाहीत; असे सुद्धा अहिवळे यांनी स्पष्ट केले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तिकिटावर संविधान संघर्ष समितीच्या माध्यमातून प्राध्यापक रमेश आढाव हे निवडणूक लढवत असून त्यांचे उमेदवारी चिन्ह हे रोड रोलर आहे. तरी रोड रोलर समोरील बटन दाबून रमेश आढाव यांना फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमधून प्रचंड बहुमताने विजयी करावे; असे आवाहन सुद्धा यावेळी सुधीर अहिवळे यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!