सणासुदीच्या काळात महागाईचा उच्चांक; साखरेचे दर साठ रुपयांच्या पुढे

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दिवाळीच्या सणात सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला मोठा फटका बसला असून, किरकोळ बाजारात साखरेचे दर साठ रुपयांच्या पुढे गेल्याने महागाईचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

स्थैर्य, सातारा, दि. ०८ नोव्हेंबर : देशभरात दिवाळीचा सण उत्साहात साजरी होत असतानाच वाढत्या महागाईने नागरिकांच्या अडचणीत भर घातली आहे. ग्राहक व्यवहार विभागाच्या आकडेवारीनुसार, ६ नोव्हेंबर रोजी साखरेचा सरासरी दर ६०.२२ रुपये प्रति किलो नोंदवला गेला आहे. राजधानी दिल्लीत साखर ६५ रुपये तर मुंबईत ६३ रुपये प्रति किलो दराने विकली जात असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत या दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे.

सणासुदीला तेलाचे आणि कांद्याचे दर वाढले

फक्त साखरच नव्हे, तर मोहरीचे तेल, कांदा आणि विविध डाळींच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत. देशातील अनेक भागांत मोहरीचा भाव आठ हजार रुपये प्रति क्विंटलच्या वर गेला असून मोहरीचे तेल २१० रुपये प्रति किलो दराने विकले जात आहे. मागील वर्षाच्या तुलनेत तेलाच्या दरात अकरा टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. तसेच कांद्याचे दर आणि डाळींच्या किमती सुद्धा वाढल्यामुळे सणसुदीच्या काळात सर्वसामान्य ग्राहकांचे बजेट कोलमडले आहे.

साखर उत्पादनात वाढ पण दिलासा नाही

दुसरीकडे, चालू हंगामात साखर उत्पादनाबाबत सकारात्मक आकडेवारी समोर येत असून, देशभरात साखर कारखान्यांमध्ये ऊस गाळप सुरू झाले आहे. महाराष्ट्रात १३६ कारखान्यांमध्ये गाळप सुरू होऊन १.०७८ दशलक्ष टन साखरेचे उत्पादन झाले आहे. मात्र, उत्पादनात वाढ होत असली तरी किरकोळ बाजारातील वाढलेल्या दरामुळे ग्राहकांना दिलासा मिळालेला नाही.

 

 

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!