यशवंतरावजी चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त १२ मार्च रोजी कराडमध्ये जेष्ठ पत्रकार मधुकर भावे यांचे व्याख्यान व साहित्यिकांचा सन्मान सोहळा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा
दैनिक स्थैर्य । दि. 10 मार्च 2022 । कराड । दैनिक प्रीतिसंगम रौप्यमहोत्सवी महोत्सवी वर्षानिमित्त व यशवंत नगरी न्यूज नेटवर्कच्या व्दिदशक वाटचाली निमित्त यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीचे औचित्य साधून शनिवार दिनांक १२ मार्च २०२२ रोजी सकाळी १० वाजता स्वर्गीय वेणूताई चव्हाण स्मारक कराड येथे महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांचे जाहीर व्याख्यान आयोजित केले असुन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिक्कीम राज्याचे माजी राज्यपाल खासदार श्रीनिवास पाटील हे उपस्थित राहणार आहेत.
स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती दिनानिमित्त सातारा जिल्ह्यातील साहित्यिकांचा सन्मान ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे व खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते होणार आहे सातारा जिल्ह्यातील साहित्यिक विद्याधर गोखले ,डॉ. शिवाजीराव ठोंबरे, महादेव साने, सी.डी. पवार, बबन पोतदार, डॉ. मच्छिंद्र सकटे, अॅड. संभाजीराव मोहिते, डॉ. सुभाषकुमार बोबडे ,सुभाषराव गुरव, अरुण काकडे ,बसवेश्वर चेणगे, शंकर कवळे, संदीप डाकवे, माणिक बनकर, अभयकुमार देशमुख, सौ. अनघा दातार, सुहास इनामदार या साहित्यिकांचा सन्मान होणार असल्याची माहिती संयोजक दैनिक प्रीतिसंगम चे संपादक शशिकांत पाटील व यशवंत नगरी न्यूज नेटवर्क चे संपादक विकास भोसले यांनी दिली. व्याख्यान व सन्मान सोहळा समारंभास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे . आवाहन यावेळी संयोजकांनी केले आहे .

Back to top button
Don`t copy text!