
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. १७ जुलै २०२४ | फलटण |
लोकनेते स्व. विनायकराव शामराव पाटील (आबा) यांच्या ५० व्या जयंतीनिमित्त शनिवार, दि. २० जुलै २०२४ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजता आंदरुड (ता. फलटण) येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले आहे.
या शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते होणार असून या शिबिराचे संयोजन लोकनेते विनायकराव पाटील प्रतिष्ठान, आंदरुड यांनी केले आहे.
