दैनिक स्थैर्य | दि. ३ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने ८ मे २०२३ रोजी घेण्यात आलेल्या मुख्य कृषी सेवा परीक्षेतून गोखळी (ता. फलटण) गावचे सुपुत्र सूरज जितेंद्र गावडे याने यश संपादन करून त्याची मंडल कृषी अधिकारी (वर्ग २) पदी निवड झाली आहे.
सूरज गावडे याने ऑगस्ट २०२३ मध्ये मुलाखत दिली होती. १ नोव्हेंबर रोजी परीक्षेचा निकाल लागला. सूरज हा रयत शिक्षण संस्थेच्या नागेश्वर विद्यालय शेटफळगढे (ता. इंदापूर) शाखेचे प्राचार्य जितेंद्र गोविंद गावडे यांचा मुलगा आहे. त्याचे शालेय शिक्षण विद्या प्रतिष्ठान बारामती येथे, उच्च माध्यमिक शिक्षण शारदा नगर येथे तर महाविद्यालयीन शिक्षण महात्मा फुले कृषी महाविद्यालय, पुणे येथे झाले आहे. त्याला मिळालेल्या यशाचे सर्व सहकारी मित्र, मार्गदर्शक शिक्षक, नातेवाईक व गोखळी ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.