
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. २२ जानेवारी २०२४ | फलटण |
पनवेल महानगरपालिकेत फलटणच्या मंगळवार पेठेतील सागर अहिवळे यांची विधी अधिकारीपदी (लास १) निवड झाली आहे.
या निवडीबद्दल सागर अहिवळे यांची मंगळवार पेठेमधून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी अनेक महिलांनी त्यांचे औक्षण करून पेढा भरविला.
सागर अहिवळे यांच्या निवडीबद्दल सागर सोरटे व मित्रमंडळाने फलटण नगर परिषदेच्या भाऊसाहेब जाधव वाचनालयामध्ये त्यांचा सत्कार केला.
