माण पंचायत समितीपदी रंजना जगदाळे यांची निवड : माण तालुका प्राथमिक शिक्षक संघाकडून त्यांचे अभिनंदन


दैनिक स्थैर्य । दि.१५ फेब्रुवारी २०२१ । माण । माण पंचायत समितीच्या सभापती पदी मा. रंजना हरिभाऊ जगदाळे यांची निवड झाली. त्या निवडीबद्दल माण तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने सत्कार केला.या वेळी शिक्षकांचे सर्व प्रश्न मार्गी लावण्याचा अभिवचन नवनियुक्त सभापती रंजना जगदाळे यांनी दिली.

माण तालुक्यातील शैक्षणिक दर्जा चांगला असून शाळांना पायाभूत सुविधेबरोबर शैक्षणिक उपक्रम राबविण्यावर शिक्षकांनी भर द्यावा. या कामामध्ये पंचायत समिती माण शिक्षकांना व शाळांना सर्वतोपरी सहकार्य करेल अशा त्या म्हणाल्या.

यावेळी शिक्षक बँकेचे व्हा.चेअरमन महेंद्र अवघडे, शिक्षण विस्तार अधिकारी रमेश गंबरे,मोहनराव जाधव, हणमंत अवघडे, हरीश गोरे,सुरज तुपे,बळीराम वीरकर,रामभाऊ खाडे, महादेव जाधव व इतर कर्मचारी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!