विद्यापीठीय हॉकी स्पर्धेत फलटणच्या कृषि महाविद्यालयाच्या खेळाडूची निवड

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य । दि. १८ जानेवारी २०२३ । फलटण । राष्ट्रीय हॉकी क्रीडा स्पर्धेसाठी कृषि महाविद्यालयातील विशाल शिवाजी पवार या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावरील होणाऱ्या हॉकी क्रीडा स्पर्धेसाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीतील विद्यापीठीय संघात स्थान मिळवून महाविद्यालयाचा नावलौकिक राष्ट्रीय स्तरावर वाढविला आहे. फलटण येथील असणाऱ्या कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीच्या राष्ट्रीय स्तरावरील हॉकी स्पर्धेसाठी निवड झाली. पश्चिम विभगीय आंतर विद्यापीठीय हॉकी क्रीडा स्पर्धा सन २०२२-२३ मध्ये राणी लक्ष्मीबाई शारीरिक शिक्षण विद्यापीठ, ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) या ठिकाणी संपन्न होणार आहे. सदरील क्रीडा स्पर्धेसाठी प्रशिक्षक व मार्गदर्शक म्हणून क्रीडा विभागाचे सहायक प्राध्यापक प्रशांत सावंत लाभले.

पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठीय हॉकी क्रीडा स्पर्धेसाठी कृषि महाविद्यालय, फलटण येथील विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावर निवड झाल्याबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी अरविंद निकम, अधिक्षक श्रीकांत फडतरे, प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्याचे, क्रीडा विभागाचे प्राध्यापक प्रशांत सावंत यांचे अभिनंदन केले व भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Back to top button
Don`t copy text!