सातारा जिल्हा ‘क्लस्टर हेड’पदी जमशेद पठाण यांची निवड

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २२ जानेवारी २०२४ | फलटण |
राष्ट्रीय उद्धमिता व औद्योगिक विकास कार्पोरेशन मायक्रो स्मॉल सूक्ष्म आणि लघु मंत्रालय भारत सरकार यांच्या सातारा जिल्हा ‘क्लस्टर हेड’पदी जमशेद पठाण (फलटण) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसे पत्र ‘एमएसएमइ’चे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी दिले आहे.

या निवडीबद्दल जमशेद पठाण यांनी सांगितले की, ‘एमएसएमइ’ हे केंद्रीय लघु व सूक्ष्म मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने जिल्हा, महाराष्ट्र व पूर्ण देशात बेरोजगार लघु मध्यम उद्योग उद्यम बाजारपेठ, लहान मोठे व्यापारी, शेतकरी, बचत गटांना व लघु उद्योगांना राष्ट्रीयकृत बँकेच्या वतीने उद्योग सक्षम करण्याचे कार्य करते. देशातील रोजगार व उद्योग वाढवण्यासाठी ही यंत्रणा काम करते. नीडको ही भारत सरकारच्या एमएसएमइ सिडको बँकेची नोडल एजन्सी असून ती मुद्रा लोन स्टॅन्डअप इंडिया लोन उद्धमी मित्र नवोद्योजकांना मदत मिळवून देण्यासाठी कार्य करते. नवउद्योजक, शेतकरी गट, महिला बचत गटांनी, छोटे-मोठे व्यापार्‍यांनी याचा लाभ घ्यावा व ८१ ७७ ८७ १२ २१ या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन केले.


Back to top button
Don`t copy text!