कृषि महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनींची कृषी अधिकारीपदी निवड

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य | दि. ९ जून २०२३ | फलटण |
फलटणच्या कृषी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनींची महाराष्ट्र लोकसेवा आयोगांतर्गत घेण्यात येणार्‍या महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेमधून तालुका कृषी अधिकारी व मंडल कृषी अधिकारीपदी निवड झाली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगांतर्गत सन २०२२-२३ मध्ये महाराष्ट्र कृषि सेवा ‘गट अ’ व ‘गट ब’ पदाची परीक्षा घेण्यात आली. महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेंतर्गत कृषि महाविद्यालय फलटण येथील माजी विद्यार्थिनी कुमारी प्रगती तावरे (मु. पो. मोरगाव, ता. बारामती, जि. पुणे) या माजी विद्यार्थिनींची तालुका कृषी अधिकारी ‘गट ब’ वरिष्ठपदी व माजी विद्यार्थिनी कुमारी जयश्री लोखंडे (मु. पो. सांगवी, ता. खंडाळा, जि. सातारा) या माजी विद्यार्थिनीची मंडळ कृषि अधिकारी ‘गट ब’ कनिष्ठपदी निवड मिळवून महाविद्यालयाचा नावलौकिक वाढविला. सदरील परीक्षेसाठी महाविद्यालयातील स्पर्धा मंचचे मार्गदर्शन लाभले.

कृषी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनींची निवड झाल्याबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशनचे अध्यक्ष व जिल्हा परिषद सातारचे माजी अध्यक्ष, फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीचे मे. गव्हर्निंग कौंसिलचे सभासद सदस्य, फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी श्री. अरविंद निकम, अधिक्षक श्री. श्रीकांत फडतरे, प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर यांनी निवड झालेल्या माजी विद्यार्थिनींचे व स्पर्धा मंचचे अभिनंदन केले व भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Back to top button
Don`t copy text!