आकाश सावंत यांची जलसंपदा खात्यात कनिष्ठ अभियंता म्हणून निवड

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०८ एप्रिल २०२३ । बारामती । बारामती तालुक्यातील सावंतवाडी गोजुबावी येथील आकाश प्रदीप सावंत यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या शासनाच्या जलसंपदा विभागात कनिष्ठ अभियंता पदी निवड करण्यात आली आहे.

आकाश सावंत हे बी ई सिव्हिल असून आंगस्ट २०२२ मध्ये सदर परीक्षा दिली व 1 एप्रिल रोजी निकाल घोषित करण्यात आला. 32000 परीक्षार्थी मधून राज्यात १८५ वा क्रमांक पटकावला असून सुरेश जाधव,गोरख सावंत, हरीश जाधव, विक्रम सावंत, शरद सावंत, प्रमोद खराडे व सावंतवाडी गोजुबावी मधील नागरिकांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या आहेत.

आई वडिलांचे आशीर्वाद व अभ्यास या जोरावर यश मिळवले असून कमी पाऊस, कमी पाणी व पर्यावरण आदी विषयावर शासनाच्या माध्यमातून जनजागृती करून जनतेची सेवा प्रामाणिकपणे करणार असल्याचे सत्काराला उत्तर देताना आकाश सावंत यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!