दैनिक स्थैर्य । दि. ३० जानेवारी २०२३ । मुंबई । सेक्यूराइट या आघाडीच्या जागतिक एंटरप्राइझ सायबर सिक्युरिटी सोल्यूशन्स प्रदाता कंपनीने आज हॉकहंट एक्सडीआर (एक्सटेण्डेड डिटेक्शन अॅण्ड रिस्पॉन्स) चे प्रगत व्हर्जन लॉन्च केले. नवीन थ्रेट डिटेक्शन व इन्सिडंट रिस्पॉन्स टूलमध्ये युनिफाईड सिक्युरिटी ऑपरेशन्स सिस्टममधील विविध सुरक्षा उत्पादनांच्या डेटाचा समावेश आहे, ज्यामधून अत्याधुनिक सायबर हल्ल्यांपासून सर्वांगीण संरक्षण मिळते.
सेक्यूराइट हॉकहंट एक्सडीआर २.० विविध स्त्रोतांकडून डेटा केंद्रीकृत, सामान्यीकरण आणि परस्परसंबंधित करण्यासाठी अॅनालिटिक्स व ऑटोमेशन वापरते, अशा प्रकारे सुरक्षा प्रक्रिया सुलभ व प्रबळ करताना रिअल-टाइम क्रॉस-कंट्रोल-पॉइण्ट संरक्षण सक्षम करते. सायबरसुरक्षा सोल्यूशन मालिशियस एन्क्रिप्शन प्रक्रिया शोधून सायबर धोक्यांना देखील अवरोधित करते आणि कोणत्याही नेटवर्कमध्ये व्यत्यय आणण्यापूर्वी त्यांना बंद करते. यात अलर्ट कोरेलेशन आणि नॉइज कमी करण्यासाठी बहु-स्तरीय मार्गदर्शन विश्लेषणे देखील आहेत.
क्विक हील येथील संयुक्त व्यवस्थापकीय संचालक व चीफ टेक्नोलॉजी ऑफिसर डॉ. संजय काटकर म्हणाले, ‘‘क्विक थ्रेट डिटेक्शन आणि इन्सिडंट रिस्पॉन्स हे प्रबळ सायबर सुरक्षिततेचे प्रमुख स्रोत आहेत. सेक्यूराइटमध्ये आम्ही नवनिर्मिती करतो आणि उद्योगासाठी भविष्याकरिता सुसज्ज सोल्यूशन्स सादर करतो. हॉकहंट एक्सडीआर २.० सह आम्ही डेटा सुरक्षिततेप्रती आधुनिक दृष्टीकोनाचा अवलंब केला आहे. नवीन व्हर्जन अत्यंत विश्वसनीय इकोसिस्टम निर्माण करते, ज्यामधून उद्योगाला सर्वांगीण संरक्षण मिळते. मला खात्री आहे की, हॉकहंट एक्सडीआरच्या आमच्या नवीन व्हर्जनसह आमचे ग्राहक त्यांच्या सुरक्षिततेसंदर्भातील पायाभूत सुविधा अधिक दृढ करू शकतील.’’
हॉकहंट एक्स्डीआरच्या नवीन व्हर्जनमध्ये विविध प्रगत वैशिष्ट्ये आहेत, जसे एसओएआर (सिक्युरिअी ऑर्केस्ट्रेशन, ऑटोमेशन अॅण्ड रिस्पॉन्स) ऑटोमेशन, थ्रेट हंटिंग वर्कबेंच, हिस्टोरिकल डेटाच्या १८० दिवसांवर आयओसी सर्च अॅण्ड किल. यामधील एमएल/एआय-पॉवर्ड, २४/७ अवेक विजिलन्स व बीहेवियर अनॉमली डिटेक्शन बहुस्तरीय संरक्षण देते, तर ऑटोमेटेड इंसिडंट कोरेलेशन अॅण्ड एनरिचमेंट, इंसिडंट मॅनेजमेंट, एसएलए मॅनेजमेंट व सविस्तर एसओसी डॅशबोर्ड्स, प्लेबुक-आधारित ऑटोमेशन, शेअर्ड थ्रेट इंटेलिजन्स झीरो-डे व प्रगत सातत्यपूर्ण धोक्यांचा सामना करतात.